Home महाराष्ट्र कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच निर्घुण खून, थरारक घटना

कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच निर्घुण खून, थरारक घटना

Breaking News: Hingoli Murder: कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच कुणीतरी धारदार शस्त्राने खून केला.

Agriculture supervisor murder in his office

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): आखाडा बाळापूर येथील कृषी संशोधन व तालुका बीजगुणन केंद्राचे प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच कुणीतरी धारदार शस्त्राने खून केला आहे. तोंडावर, छातीवर, हातावर धारदार शस्त्राचे वार असून, रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला.

राजेश शिवाजीराव कोल्हाळ (३६, रा. कोंडवाडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे मृत कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. सकाळी ११:३० वाजता ते कार्यालयात येऊन नियमित कामकाज करीत होते. त्यानंतर येथील कामगार कार्यालयात काही कामानिमित्त आले असता, त्यांना रक्ताच्या थारोळ्यात अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला. फरशीवर, टेबलवर, आडव्या झालेल्या खुर्चीवर सर्वत्र रक्तच रक्त दिसून आले. टेबलवर मोबाइल, पेन आणि मस्टर खुल्या अवस्थेत आढळून आले.

२०१४ साली ते कृषी विभागात रुजू झाले. पण, ते विदर्भात कार्यरत होते. आठ महिन्यांपूर्वीच ते बाळापुरात रुजू झाले असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मूल असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

बीजगुणन केंद्रात पाच ते सहा रोजंदारी कर्मचारी काम करतात. दोन दिवसांपूर्वी येथे वाळलेल्या गवताला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर पर्यवेक्षक कोल्हाळ यांनी संताप व्यक्त केला होता. त्या कारणावरून वादही झाल्याचे कामगारांनी सांगितले.

Web Title: Agriculture supervisor murder in his office

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here