Home अकोले अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडा साफ, विखेंचा बोलबाला

अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडा साफ, विखेंचा बोलबाला

Ahmednagar Assembly Election 2024: अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे, महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले असून अनेक धक्कादायक निकाल समोर. 

Ahilyanagar Assembly Election Mahavikas Aghadi's victory is clear, Vikhs dominate

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात कोण आमदार होणार याचा आज फैसला होणार आहे. तसेच काही मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून चुरशीची लढत पाहायला मिळते आहे.यात कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले असून त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे, महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले असून अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे.

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या राहाता मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी त्यांना प्रभावती घोगरे यांनी चांगलीच लढत दिली.

एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार्‍या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे.

महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे (शिवसेना शिंदे गट) ४०२१ मतांनी विजयी. महाविकास आघाडीचे उमेदवार शंकराव गडाख (शिवसेना ठाकरे) यांचा पराभव. बाळासाहेब मुरकुटे यांच्यानंतर लंघे ठरले जायंट किलर

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १२ मतदारसंघाचे अपडेट्स तुम्हाला ह्या ठिकाणी वाचायला मिळतील अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा

नगर शहर – 39452 मतांनी संग्राम जगताप विजयी ! अभिषेक कळमकर यांचा पराभव

पारनेर – Round, 14/27 = काशीनाथ दाते 7405 मतांनी आघाडीवर

श्रीगोंदा – Round, 16/25 = विक्रम पाचपुते 18077 मतांनी आघाडीवर

कर्जत जामखेड – Round, 18/26 = राम शिंदे 903 मतांनी आघाडीवर.

शेवगाव पाथर्डी – Round, 17/27 = मोनिका राजळे 16453 मतांनी आघाडीवर

राहुरी – Round, 12/22 = शिवाजी कर्डीले 4452 मतांनी आघाडीवर

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक निकाल बाळासाहेब थोरातांचा पराभव ! 

शिर्डी – 70282 मतांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय

कोपरगाव – महाराष्ट्रात सर्वाधिक लीड घेऊन आशुतोष काळे यांचा विजय

नेवासे – विठ्ठल लंघे यांचा 4021 मतांनी विजय ! गडाखांना पराभवाचा धक्का

श्रीरामपूर – Round, 23/24 = हेमंत ओगले 13046 मतांनी आघाडीवर

अकोले – किरण लहामटे 5556 मतांनी विजय ! शरद पवार गटाचे अमित भांगरे यांचा पराभव

Web Title: Ahilyanagar Assembly Election Mahavikas Aghadi’s victory is clear, Vikhs dominate

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here