अहिल्यानगर: टँकरच्या धडकेत युवतीचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवतीचा मृत्यू झाला.
अहिल्यानगर : टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवतीचा मृत्यू झाला असून तिचे वडिल जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सैन्य दलाच्या सीक्यूएव्ही गेटसमोर ११ मे रोजी हा अपघात झाला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जानवी विश्वनाथ शेळके (वय २०, रा. गुलमोहर रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) असे मयत युवतीचे नाव असून तिचे वडिल विश्वनाथ शेळके जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्वनाथ शेळके व मुलगी जानवी हे अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून दुचाकीने प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक दिली. या धडकेत जानवीचा मृत्यू झाला तर विश्वनाथ जखमी झाले. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर ताब्यात घेतला. सदरचा टँकर अमोल बबन बोखारे (रा. समर्थनगर, केडगाव रस्ता, अहिल्यानगर) हा चालवित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी करीत आहेत.
अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण
अहिल्यानगर : केडगाव मधील एकनाथ नगर परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना ८ मे रोजी सकाळी १०.१५ ते सायंकाळी ७.१५ या कालावधीत घडली. सदर मुलीची आई व इतर कुटुंबीय सकाळी कामावर गेले होते. तेव्हा मुलगी एकटीच घरी होती. सायंकाळी कुटुंबीय कामावरून घरी आले असता त्यांना मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी तिचा शेजारी तसेच केडगाव व नगर शहरात शोध घेतला. परंतु ती मिळुन आली नाही, तिचा मोबाईलही बंद लागत होता. त्यानंतर ३ दिवस तिचा शोध घेतल्यावर ११ मे रोजी मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी एका इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करीत आहेत.
Breaking News: Ahilyanagar Death of a girl due to the bang of a gurney