Home क्रीडा IPL 2022 : अहमदाबाद आणि लखनऊ संघाने निवडले आपले तीन-तीन खेळाडू

IPL 2022 : अहमदाबाद आणि लखनऊ संघाने निवडले आपले तीन-तीन खेळाडू

Ahmadabad Lucknow  IPL Team

IPL 2022 : आयपीएल २०२२ चा महालिलाव फेब्रुवारी महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला बंगळूर येथे होणार आहे. येणाऱ्या १५ व्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. महालिलावापूर्वी सर्व संघांना जास्तीत जास्त चार खेळाडूंना संघात रिटेन करण्याची परवानगी मिळाली होती. नव्याने समाविष्ट झालेल्या दोन नवीन फ्रेंचायझींना देखील तीन खेळाडू निवडता येणार असल्याचा अधिकार देण्यात आला. दरम्यान, अहमदाबाद आणि लखनऊ संघाने आपल्या तीन खेळाडूंची निवड आता केली आहे.

लखनऊने केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉइनिस ( Marcus Stoinis) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या तिघांना करारबद्ध केले आहे. त्यामुळे हे तिघेही पुढच्या हंगामात लखनऊ फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसतील. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या राहुलकडे लखनऊ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपिवण्यात येणार असल्याची शक्यता अधिक आहे. लखनऊने राहुलला 15 कोटी, स्टॉइनिसला 11 कोटी तर बिश्नोईला चार कोटी रुपये देत संघासाठी निवडले आहे.

दुसरीकडे अहमबाद फ्रँचायझीनं मुंबईने रिलीज केलेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि राशीद खानला (Rashid Khan) प्रत्येकी १५ कोटी तर शुभमन गिलला (Shubman Gill)) ७ कोटी रुपये मोजून आपल्या संघासाठी निवडले आहे. यादरम्यान हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाची कमान सोपवली जाऊ शकते. तसेच पंड्या ब्रदर पैकी दुसरा बंधू कृणाल पंड्याला (Krunal Pandya) मुंबई पुन्हा खरेदी करते कि अहमदाबाद फ्रँचायझी त्यालाही हार्दिकच्या जोडीला खरेदी करतो हे लिलावात समजणार आहे. शिवाय अहमदाबादची नजर मुंबईने रिलीज केलेल्या व गुजरात लायन्स साठी खेळलेल्या ईशान किशनवर (Ishan Kishan) देखील असू शकते. मात्र कोणता खेळाडू कुणाकडे? यासाठी १२ व १३ फेब्रुवारीची (IPL 2022 Mega Auction) प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title : IPL 2022: Ahmadabad and Lucknow select three players each

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here