अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण तर ७२४ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात काल सायंकाळी ६ वाजेपासून ते आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४०५ रुग्ण वाढले आहेत. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४१ हजार १४२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ५ , खासगी प्रयोगशाळेत २०७ आणि अॅटीजेन चाचणीत १९३ करोनाबाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत २०७ रुग्ण यामध्ये मनपा ७१, अकोले ३, जामखेड २, कोपरगाव ४, नगर ग्रामीण १३, नेवासा ६, पारनेर ११, पाथर्डी ३, राहता २३, राहुरी ३२, संगमनेर १७, शेवगाव ४, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १७ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत १९३ करोनाबाधित यामध्ये कोपरगाव २०, नगर ग्रामीण १६, नेवासा २४, पाथर्डी २४, रहाता ३६, राहुरी १९, संगमनेर ३२, श्रीगोंदा २१, कॅन्टोनमेंट १ असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आज ७२४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे यामध्ये मनपा १६०. अकोले ३७, जामखेड ४२, कर्जत १९, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ४२,नेवासा ३६, पारनेर २९, पाथर्डी ३०, राहता ६८, राहुरी ४३, संगमनेर ५१, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ५५, कॅन्टोनमेंट २, मिलिटरी हॉस्पिटल ३, इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत ३९ हजार ५६२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित संख्या ४४ हजार ४२८ इतकी झाली आहे. मृत्यू ७२४ झाले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 724 Corona patient discharge