Home अहिल्यानगर ८ वर्षीय बालिकेवर २८ वर्षीय तरुणाकडून अत्याचार, तरुणास अटक

८ वर्षीय बालिकेवर २८ वर्षीय तरुणाकडून अत्याचार, तरुणास अटक

Ahmednagar 8-year-old girl tortured by 28-year-old youth

अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील एका गावात गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी तिसरीत शिकत असलेल्या ८ वर्षीय बालिकेवर घराशेजारी राहत असलेल्या एका २८ वर्षीय नराधम तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

रशीद बेग असे या नराधमाचे नाव आहे. यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका गावात राहत असलेली पिडीत चिमुकली व हा नराधम तरुण एकाच गल्लीत राहतात. गुरुवारी या पिडीत बालिकेची आई घरात काम करत होती. भाऊ आजारी असल्याने घरात झोपला होता. मुलगी न दिसल्याने तिच्या आईने शोधाशोध केली मुलगी दिसून आली नाही.

त्यानंतर काही वेळाने रशीद याने पिडीत मुलीला घरी सोडले व तेथून तो पळून गेला. मुलगी मात्र घामाघूम होऊन रडत होती. आईने रडण्याचे कारण विचारले असता पिडीत मुलीने सांगितले की, मी खेळत असताना रशीद तेथे आला व मोबाईल खेळायला चाल असे सांगून त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे नेल्यावर घराचा दरवाजा लावून तोंडावर रुमाल बांधला, कानात कापसाचे बोळे घातले व अत्याचार केल्याचे सांगितले.

रशीद सरदार बेग याच्याविरोधात एमआयडीसी प[पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रशीद याला अटक केली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 8-year-old girl tortured by 28-year-old youth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here