Ahmednagar: जिल्ह्यात आज ८३४ रुग्णांना डिस्चार्ज तर इतके रुग्ण वाढले
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ८३४ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले असून एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३८ हजार ३६५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०१ टक्के झाले आहे.
आज ८३४ रुग्ण बरे झाले यामध्ये मनपा १७५, अकोले,३६, जामखेड ४१, कर्जत ३१, कोपरगाव ४४, नगर ग्रामीण ८७, नेवासा ३०, पारनेर ४०, पाथर्डी ६३, राहता ६५, राहुरी ५६, संगमनेर ५३, शेवगाव २३, श्रीगोंदा ३७, श्रीरामपूर २६, कॅन्टोनमेंट १३, मिलिटरी हॉस्पिटल १४, अशा रुग्णांचा समावेश आहे.
सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज मंगळवारी १२ वाजेपर्यंत ९९ रुग्ण वाढले आहे. यामुळे सध्या ४०३९ रुग्ण उपचार घेत आहेत.
आज करोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांत मनपा २२, कोपरगाव १, नगर ग्रामीण १०, नेवासा १, पारनेर १०, पाथर्डी १०, शेवगाव ८, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १५, मिलिटरी हॉस्पिटल १० असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४३ हजार १०२ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ६९८ रुग्ण मयत झाले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 824 patient dischrase incresed corona infected