Breaking News | Ahmednagar: १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर.
अहमदनगर : एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पीडितने दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ बबन झांजे (रा. वाहिरा, ता. आष्टी, जि. बीड) याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई घरी नसताना आरोपीने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार आईला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Ahmednagar Abuse of a minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study