Home Accident News Accident: ट्रकची दुचाकीला समोरून धडक, एक जण ठार

Accident: ट्रकची दुचाकीला समोरून धडक, एक जण ठार

Ahmednagar Accident truck hit the two-wheeler in front

Ahmednagar Accident News | अहमदनगर: ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर- सोलापूर महामार्गावर रूईछत्तीशी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला या अपघातात योगेश मच्छिंद्र मुरूमकर (वय 30 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) या तरूण ठार झाला.

याप्रकरणी अंबादास अंकुश मुरूमकर (वय 24 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश मुरूमकर हे मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या दुचाकीवरून बनपिंप्री (ता. श्रीगोंदे) येथून अहमदनगरच्या दिशेने येत होते. याचवेळी अहमदनगरकडून सोलापूरकडे जाणार्‍या ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात रूईछत्तीशी गावातील जानईवस्तीजवळ दुचाकीला समोरून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार योगेश मुरूमकर हे ठार झाले. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.  या अपघाताचीमाहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने ताब्यात घेतली आहे.

याबाबत अंबादास मुरूमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बी. एम. गांगर्डे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Accident truck hit the two-wheeler in front

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here