विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आता अँटीजेन टेस्ट: जिल्हाधिकारी
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावखाली विनाकारण फिरत असतात. आता विनाकारण संचार करणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी सायंकाळी दिले आहेत.
अत्यवश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणाऱ्यांची संख्या जिल्हात वाढली आहे असे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोनाला खतपाणी मिळत आहे. आणि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना चाचणी पथकाबरोबर एक पोलीस पथकही असणार आहे. पोलीस पथकासोबत वेळेत चाचणी करणारे मनुष्यबळ व आवश्यक सामग्री देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनास दिले आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण आणता येणार आहे.
या आदेशाची अंमलबजावणी सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सुरु होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी विनाकारण आढळून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून त्यांचा अहवालही आरोग्य यंत्रणा पोर्टलवर अपलोड करणार आहे. त्यामुळे किती लोक विनाकारण फिरतात याची माहिती प्रशासनाला मिळणार आहे.
Web Title: Ahmednagar Antigen tests now on citizens who roam