दोन तपापासून रखडलेली नगर हाय स्पीड रेल्वे १७ डिसेंबरपासून धावणार
अहमदनगर | Beed Railway: दोन तपापासून रखडलेली नगर व बीड जिल्ह्याच्या दळणवळण साठी महत्वाचा असलेला नगर ते बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सुरु असून नगर आष्टीचे ६२ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
नगर आष्टीपर्यंत हायस्पीड रेल्वे १७ डिसेंबरपासून धावणार आहे. २७ वर्षापासून राखाडला नगर परळीचा रेल्वेचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन वेळा इंजिन चाचणी झाली आहे.
रेल्वे सुरक्षा आयोगाचे मनोज अरोरा, मुख्य अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता, विजयकुमार राय सोलापूरचे चंदरभागा सिंग अहमदनगर रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन होणार आहे. बीड जिल्हावासीयांचा जिव्हाळ्याचा रेल्वे प्रश्न आता कुठे तरी मार्गी लागण्याचे संकेत निर्माण झाले आहे.
Web Title: Ahmednagar Beed railway Started on 17 December