Home Ahmednagar Live News पुलावरून गोदावरी नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला

पुलावरून गोदावरी नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला

Ahmednagar body of a young woman who jumped into the Godavari river from the bridge was found

Ahmednagar News Live | Kopargaoin | कोपरगाव: दोन दिवसापूर्वी गोदावरी नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या पथकाच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

साक्षी संजय जगझाप वय १९ रा. येवला रोड जय श्रीरामनगर कोपरगाव असे मयत विद्यार्थिनीचे  नाव आहे. ती एका नामांकित कोलेजमध्ये बीएससी प्रथम वर्षासाठी शिकत होती.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नगर मनमाड रोडवरील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून एका युवतीने पुलावर आपली पिशवी ठेवत नदीत उडी घेतली. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने पाहिले असता त्याने घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पुलावर ठेवलेल्या पिशवीत टी महाविद्यालयीन युवती असल्याचे समजले. मात्र तीच नाव समोर आले नव्हते. पोलीस ठाण्यातही कोणती युवती बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नव्हती.  त्यामुळे दोन दिवस या घटनेचे गूढ उकलले नव्हते. गुरुवारी सकाळी तिचे प्रेत तरंगताना आढळून आले आहे. अग्निशामन दलाने यावेळी सहकार्य केले. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar body of a young woman who jumped into the Godavari river from the bridge was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here