Home Ahmednagar Live News मोठी बातमी: अहमदनगर जिल्ह्यात या कंपनीला भीषण आग

मोठी बातमी: अहमदनगर जिल्ह्यात या कंपनीला भीषण आग

Ahmednagar Chemical company catches fire

Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग (Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीरामपूर, लोणी, राहता येथील अग्निशमक दल दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

अधिक माहितीनुसार, श्रीरामपूरमधील एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी  न झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केले असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Ahmednagar Chemical company catches fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here