अहमदनगर शहराचे नाव आता ‘अहिल्यानगर’, तर पुण्यातली वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’, सरकारचा निर्णय
Breaking News | Ahmednagar Name Changed: अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचेही नाव बदलण्यात आले असून आता या तालुक्याला राजगड असे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, “राज्य सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे.”
मुख्यमंत्री (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
Web Title: Ahmednagar city now named as ‘Ahilyanagar’
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study