अहमदनगर: दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
Ahmednagar Crime News: अश्लील गाणी वाजवण्यावरून मंगलगेट परिसरातील दाणे डाबरा येथे दोन गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना.
अहमदनगर: दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अश्लील गाणी वाजविण्यावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.अश्लील गाणी वाजवण्यावरून मंगलगेट परिसरातील दाणे डाबरा येथे दोन गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या मंडळासमोरील बॅनर फाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडल्याने हा वाद वाढला.
बिग ब्रेकिंग. बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस, रोहित पवारांचा २ नेत्यांवर गंभीर आरोप
मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर राजू मुर्तोडकर (रा. वंजार गल्ली, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंजित तरुण मंडळाचे सचिन तुकाराम जाधव, प्रशांत ऊर्फ रॅनबो काळे, वैभव काळे, सुरज काळे, सचिन राऊत, महेश बेद्रे, रोहीत पाथरकर व इतर १० ते १२ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजीत तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बापू काळे (रा. मंगलगेट, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर मुर्तोडकर, सनी ऊर्फ श्रीकांत मुर्तोडकर, प्रथमेश थोरात, भैया थोरात, विठ्ठल उप्पळकर, सुमित सुरसे, अमित सुरसे, ललीत चवालीया व इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Crime Clash between workers of two circles
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App