Home Ahmednagar Live News अहमदनगर ब्रेकिंग: मुलीला पळवून नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार

अहमदनगर ब्रेकिंग: मुलीला पळवून नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार

Ahmednagar Crime girl was abducted and tortured there

Ahmednagar Crime News: अहमदनगर शहरातील अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील युवकाने वसई विरार (मुंबई) येथे पळवून नेत अत्याचार केला.

भिंगार कॅम्प पोलिसांनी युवक सय्यद मलिक अली कलीम अली (वय 19 रा. निजामगंज कॉलनी, भवानीनगर, औरंगाबाद) याला जेरबंद केले असून त्या मुलीची सुटका केली आहे.

सय्यद याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुळची अहमदनगर शहराच्या एका उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी औरंगाबाद येथील युवक सय्यद मलिक अली कलीम अली याच्या संपर्कात आली.

सय्यद याने तिला लग्नाचे अमिष दाखवून वसई विरार येथे पळवून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती.

पीडित मुलीसह तिला पळवून नेणार्‍या युवकाचा तपास भिंगार पोलिसांकडून सुरू होता. सदरची मुलगी व तो युवक वसई विरार येथे असल्याची खबर पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी व त्यांच्या पथकाने वसई विरार येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणले.पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब घेतल्यानंतर युवक सय्यद याने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला.

Web Title: Ahmednagar Crime girl was abducted and tortured there

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here