Home Ahmednagar Live News खेळत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला गाडीवर बसवून पळवून नेले अन…..

खेळत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला गाडीवर बसवून पळवून नेले अन…..

Ahmednagar Crime minor girl who was playing was abducted 

Ahmednagar Crime | अहमदनगर: घरासमोर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर बसवून पळवून (abducted) नेल्याची घटना मेहकरी परिसरात रविवारी घडली. गावकर्यांनी पाठलाग करून आरोपीला पकडून चांगलाच चोप देत नगर तालुका पोलिसांच्या हवाली केले.

सागर आनंदा सुरे रा. पिशोर ता. कन्नड जि. औरंगाबाद असे अटक केलल्या आरोपीचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तीन वर्षीय अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला मोटारसायकल वरून बसवून पळवून नेले. हि बाब शेजारी असलेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आली. त्यांनी आपले कोणी नातेवाईक आले होते का तुमच्या मुलीला एक जण मोटारसायकलवर घेऊन गेला आहे अशी माहिती दिली. मुलीला पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईक सह गावकर्यांनी शोध मोहीम सुरु केली. आरोपीच्या दिशेने मोटारसायकलवरून जात गावकर्यांनी आरोपीचा पाठलाग केला असता तो रस्त्यावर मिळून आला. गावकर्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फोनद्वारे माहिती कळविली. ठाणे अंमलदार सचिन वनवे यांनी घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठविले. पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केले. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहे.  

Web Title: Ahmednagar Crime minor girl who was playing was abducted 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here