Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: आईनेच पाच महिन्याच्या मुलाचा गळा आवळला, नवरा-बायकोच्या भांडणात चिमूकलीने गमावला...

अहमदनगर ब्रेकिंग: आईनेच पाच महिन्याच्या मुलाचा गळा आवळला, नवरा-बायकोच्या भांडणात चिमूकलीने गमावला जीव

Ahmednagar Crime: नवरा-बायकोच्या भांडणात आईने आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून त्याचे अपहरण झाल्याचा बनाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे घटना ही रविवारी (दि १९) उघडकीस आली असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Ahmednagar Crime mother who murder throat of the five-month-old child

अहमदनगरः नवरा-बायकोच्या भांडणात आईने आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून त्याचे अपहरण झाल्याचा बनाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे घटना ही रविवारी (दि १९) उघडकीस आली असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

गायत्री माळी असे आरोपी आईचे नाव आहे. गायत्रीचे फिर्यादी सूरज माळी याच्याशी लग्न झाले होते. दोघे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहत होते. दोघेही मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान, सूरज हा गायत्रीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. याचा राग मनात असल्याने तिने त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा रागाच्या भरात आपल्या शिवम नावाच्या पाच महिन्यांच्या मुलाला मारहाण करून त्यांचा गळा आवळून खून केला.

एवढेच नाही तर त्याच्या मृतदेह एका शेतातील विहिरीत फेकून दिला. यानंतर दोघांनी तिच्या मुलाला पळवल्याचा बनाव देखील रचला. बाळाच्या नातेवाईकांनी आरोपींचा शोध घेतला. ते न सापडल्याने त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना बाळाची आई गायत्रीवर संशय आला. त्यांनी तपासात तिला पोलिसी हिसका दाखवल्यावर तिने गुन्हा कबूल केला. दरम्यान, रोजच्या भांडणाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे तिने कबुली दिली आहे.

Web Title: Ahmednagar Crime mother who murder throat of the five-month-old child

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here