Home Ahmednagar Live News धक्कादायक: सासऱ्याच्या तोंडात विष ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

धक्कादायक: सासऱ्याच्या तोंडात विष ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagar Crime News Attempt to kill father-in-law by pouring poison in his mouth

Ahmednagar Crime News | अहमदनगर: पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या सासर्‍याला त्याच्या सूनेसह अन्य दोघांनी विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारात शेंडीबायपासजवळ शनिवारी ही घटना घडली.  ग्यानदेव नामदेव जाधव (वय 60 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फिर्यादी शनिवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवर मोहोज (ता. पाथर्डी) येथुन त्यांचे मुलाकडे जाण्यासाठी निघाले होते. कोल्हार घाटमार्गे शेंडीबायपासने वडगाव गुप्ता शिवारात नदीजवळून येत असताना त्यांची सून सोनाली व इतर दोघांनी त्यांची दुचाकी थांबवली. फिर्यादी यांना खाली पाडले व सून सोनाली ही पायावर बसली व बाळासाहेब याने हात धरले आणि वैभवने फिर्यादी यांचे नाक दाबुन त्याचे हातातील विषाची बाटली फिर्यादी यांच्या तोंडात ओतली.

तू पेंन्शनर पोलीस असल्याने तुझ्यावर मी केलेल्या गुन्ह्यात तुला पोलीसांनी अटक केली नाही, आता तुला येथे कोण वाचविणार, तुला पाहनारे कोणी नाही, असे म्हणुन शिवीगाळ करून फिर्यादीस तोंडात विष ओतुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना अहमदनगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरूद्ध खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते (सर्व रा. शेंडी बायपास, वडगाव गुप्ता ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी फिर्यादी यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime News Attempt to kill father-in-law by pouring poison in his mouth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here