Home Ahmednagar Live News भल्या पहाटे तिघांनी मोटारसायकलवरून एकास ओढून कोयत्याने सपासप वार अन

भल्या पहाटे तिघांनी मोटारसायकलवरून एकास ओढून कोयत्याने सपासप वार अन

Ahmednagar Crime News Pull one out of the motorcycle and strike with the scythe

Ahmednagar Crime News | अहमदनगर: चितळे रोडवरील भाजी विक्रेते हे भल्या पहाटे भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना मागून आलेल्या तिघांनी त्याला खाली ओढत कोयत्याने सपासप वार केले अन त्याच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची चैन घेवून गेल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात भाजी विक्रेते संतोष उर्फ बाळासाहेब नारायण तरोटे रा. चितळी रोड हे जखमी झाले आहेत. अंगावर शहारे आणणारी घटना नगरमध्ये घडली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, चितळे रोडवरील भाजी विक्रेते संतोष उर्फ बाळासाहेब नारायण तरोटे हे सोमवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. १६ बीडब्ल्यू ९०) भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटयार्डला जात होते. ते कोर्टगल्ली येथे आले असता पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी तरोटे यांची कॉलर ओढून त्यांना खाली पाडले. नंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली. या झटापटीत एकाने तरोटे यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. याबाबत तरोटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Ahmednagar Crime News Pull one out of the motorcycle and strike with the scythe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here