Home Ahmednagar Live News Crime: नगरसेवकासह सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल

Crime: नगरसेवकासह सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime Six to seven people, including a corporator

Ahmednagar Crime | अहमदनगर: घर खाली करण्यासाठी रिक्षाचालकाच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांवर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजू कारभारी गोंडगीरे वय ४८ रा. रेणुकानगर औरंगाबाद रोड नगर यांनी फिर्याद दिली आहे.

नगरसेवक स्वप्नील शिंदे, आभी बुलाखे व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजू रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. ते सावेडी उपनगरातील बोरा यांच्या मालकीच्या जागेत मागील ५० वर्षापासून राहत आहे. ११ मार्च रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी गोंडगीरे यांच्या घरात प्रवेश करून घर खाली करण्यासाठी राजू यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच ११ मार्च रोजी साडे आठ वाजेच्या सुमारास शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Ahmednagar Crime Six to seven people, including a corporator

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here