अहमदनगरमध्ये भाजप राष्ट्रवादीची हातमिळवणी, शिवसेनेला धक्का
अहमदनगर | Ahmednagar : अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आहे.
या महापालिकेचे निवडणुकीत वेगळेच समीकरण पहायला मिळाले आहे. राज्यात भाजपाला दूर ठेवत शिवसेना राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले असताना महापालिकेत भाजप राष्ट्रवादीची हातमिळवणी झाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यापासून रखडलेली अहमदनगर स्थायी समिती सभापती निवडणूक आज पार पडली. काल भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत सामील झाले. नगर महापालिकेत शिवसेनेचे संख्या बळ अधिक असताना देखील भाजप राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar election of the chairman of the standing committee of the corporation