Home अहमदनगर अहमदनगर: इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

अहमदनगर: इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

Breaking News | Ahmednagar: म्युझिक अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानास आग लागल्याची घइलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईलसह इतर साहित्य जळून खाक.

Ahmednagar Electronics shop fire

कोपरगाव : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील कोपरगाव म्युझिक अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानास आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्याने इतर दुकानांना हानी पोहोचली नाही.

कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मनोज व राहुल पहिलवान यांचे कोपरगाव म्युझिक अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स है दुकान आहे. या दुकानाला शुक्रवार दि. १४ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलास बोलावले. पोलिस, महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ ही आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत या आगीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच दुरुस्तीस आलेले मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झाले होते. आग वेळीच आटोक्यात आल्याने परिसरातील दुकानांना कोणतीही हानी पोहोचली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Ahmednagar Electronics shop fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here