शरद पवारांनी मराठा आरक्षणाला स्थागिती दिल्यानंतर अन्नत्याग केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते
अहमदनगर: राज्यसभेत गोंधळ घालाणाऱ्या ८ खासदार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक दिवसाचा अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थागिती दिली त्यावेळी त्यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते अशी टीका भाजप नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
तसेच कृषी विधेयकावरून देखील विनोद तावडे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले काही दिवसांपासून केंद्र सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयकावरून गोंधळ सुरु आहे. पवार साहेब स्वतः कृषी मंत्री होते. त्यांनी जर विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचविल्या असत्या, राज्यसभेत बोलणे गरजेचे असते. राज्याच्या हितासाठी दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या, केवळ विरोधासाठी विरोध करणे करणे हे जेष्ठ नेते शरद पवारांनी करणे हे शेतकऱ्यांना पटलेले नाही असे विनोद तावडे यांनी सांगितले.
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar function Vinod Tawade criticism Sharad Pawar