Home Ahmednagar Live News गँस स्फोटात जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू

गँस स्फोटात जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू

Ahmednagar Girl killed in gunfight

Ahmednagar News Live | Shrirampur: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील गाढे वस्तीत राहत असणारे  शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गँस गळतीमुळे मोठा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले होते.

एकाच कुटुंबातील चारही जण भाजले होते. त्यांना प्रथम कामगार हाँस्पीटल व नंतर प्रवरा नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामधील शशिकांत शेलार यांची मुलगी नमश्री वय वर्ष ९ हीचे उपचार सुरु असताना आज सकाळी निधन झाले आहे. तिच्यावर शेलार स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेलार कुटुंबीयातील तिघांवर अजुनही प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने कुटुंबावर मोठे संकट ठाकले आहे. परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar Girl killed in gunfight

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here