अहमदनगर जिल्हा पालकमंत्री: या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
Ahmednagar | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव प्रथम क्रमांकावर आले आहे दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली तर नगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होवू शकते.
अनेक दिवसांपासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती. यामध्ये नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
यामध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा होऊ शकते.
Web Title: Ahmednagar Guardian Minister Possibility of sealing this name