Home Ahmednagar Live News महागाईचा भडका: रस्त्यावर चूल मांडत केंद्रसरकारचा निषेध, अमित भांगरे यांची जहरी टीका...

महागाईचा भडका: रस्त्यावर चूल मांडत केंद्रसरकारचा निषेध, अमित भांगरे यांची जहरी टीका   

ahmednagar Inflation erupts Central government protests news

अहमदनगर | Ahmednagar : मागील गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर सातत्याने वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसाधारण नागरिक त्रस्त झाले आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे गगनाला भिडत आहे याबाबत कोनही आवाज उठवत नाही. या महागाई विरोधात निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.यावेळी रस्त्यावर चूल मांडत केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला.

तसेच अकोले तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आं. यावेळी अकोले शहरात काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी अमित भांगरे यांनी जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दरवाढीने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. यावर कोणी बोलायला तयार नाही. कॉंग्रेसच्या काळात भाजपची सत्ता नसताना भाजपवाले डोक्यावर गॅस टाकी घेऊन फिरत होते. मात्र आता भाजपचीच सत्ता असताना, दरवाढीचा भडका झालेला असताना राजकीय पुढारी, नेते मुके झाले आहेत.

यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे,  जिल्हा उपाध्यक्ष बबन वाळूंज, तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, अमित नाईकवाडी, महेश तिकांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: ahmednagar Inflation erupts Central government protests

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here