Home Ahmednagar Live News Lockdown: अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर अकोलेसह या २१ गावांत लॉकडाऊन

Lockdown: अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर अकोलेसह या २१ गावांत लॉकडाऊन

 

Ahmednagar Lockdown News 21 villages of Sangamner Akole news

अहमदनगर | Ahmednagar Lockdown: कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील २१ गावे प्रतिबंधित करण्यात आले आहे.  61 गावात करोना नियंत्रणात आला असून उर्वरित आठ गावांत रुग्ण कमी झाले. मात्र, ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. यामुळे या आठ गावांसह नव्याने 13 गावांत कोविड लॉकडाऊन लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

करोना सक्रिय करोना रुग्ण असणार्‍या गावात अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, करोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व 14 ऑक्टोबरला पहाटे 1 वाजल्यापासून ते 23 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी काढले असून या गावात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच या गावाच्या हद्दीतून कृषी माल आणि आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंदी राहणार आहे.

लॉकडाऊन लावलेल्या गावांमध्ये पुढीलप्रमाणे तालुक्यातील गावांची नावे

अकोले | Akole: विरगाव, सुगाव बु., कळस बु.,

कोपरगाव: टाकळी

नेवासा: चांदा

पारनेर : जामगाव, वासुंदे

संगमनेर | Sangamner: उंबरी, वेल्हाळे, चंदनापूरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे

नगर: पिंपळगांव माळवी

श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ

Web Title: Ahmednagar Lockdown News 21 villages of Sangamner Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here