Home Ahmednagar Live News नगर जिल्ह्यातील या आमदारांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

नगर जिल्ह्यातील या आमदारांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

Ahmednagar MLA Ashutosh Kale's status as Minister of State

Ahmednagar News | अहमदनगर: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असून महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत अधिसूचना जारी केली असून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. 

श्री साईबाबा संस्थान  विश्वस्थव्यवस्था मंडळ, शिर्डी समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे काळे यांना आता राज्यमंत्र्यांना अनुज्ञेय असलेल्या सुविधा मिळणार आहेत. विधी आणि न्याय विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

या आदेशानुसार काळे यांना मानधन म्हणून प्रति महिना ७ हजार ५०० रुपये तर समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी प्रति बैठक ५०० रुपये आणि निवासी दूरध्वनीसाठी प्रतिमाह तीन हजार रुपये पर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.

समितीने वाहन सुविधा चालकासह उपलब्ध करून दिल्यास इंधन आणि तेलावरील खर्च प्रतिवर्ष ७२ हजार रुपयांपर्यंत किंवा अध्यक्षांना स्वतःचे वाहन खासगी वाहन चालकासह समितीच्या कामकाजासाठी वापरण्यास अनुज्ञेयता असेल आणि त्यासाठी दरमहा १० हजार रुपये देय असेल, असे आदेशात म्हटले आहे.

अध्यक्षांच्या कार्यालयीन कामकाजासाठी एक स्वीय सहाय्यक, एक लिपिक, एक शिपाई यांची सेवा उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांमधून उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Ahmednagar MLA Ashutosh Kale’s status as Minister of State

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here