Home अहमदनगर अहमदनगर महापालिकेला मिळाले नवीन आयुक्त, शासनाचा आदेश

अहमदनगर महापालिकेला मिळाले नवीन आयुक्त, शासनाचा आदेश

Breaking News | Ahmednagar: शासनाने देवीदास पवार यांची नवे आयुक्त म्हणून येथे नियुक्ती.

Ahmednagar Municipal Corporation got new Commissioner

अहमदनगर: महापालिका आयुक्त डॉ. पंकज लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्या जागी देवीदास पवार यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, डॉ. जावळे यांना कार्यमुक्त केले की नाही वा त्यांच्यावर काही प्रशासकीय कारवाई केली की नाही, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यासंदर्भात कोणताही शासन आदेश महापालिकेला आलेला नाही. बांधकाम व्यावसायिकास लाच मागितल्याचा गुन्हा डॉ. जावळेंवर दाखल झाला आहे. तेव्हापासून म्हणजे सुमारे 8 ते 10 दिवसांपासून कार्यालयात आलेले नाहीत. त्यामुळे मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने देवीदास पवार यांची नवे आयुक्त म्हणून येथे नियुक्ती केली आहे. पण डॉ. जावळेंवरील कारवाईबाबत कोणताही आदेश शासनाने जारी केलेला नाही.

देवीदास पवार अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत होते. नगर विकास विभागाने त्यांची अहमदनगर मनपा आयुक्तपदी बदलीचा आदेश दिला आहे. आयुक्त पवार यांनी परळी, लातूर, विरार, यवतमाळ, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे मुख्याधिकारी तसेच परभणी व जळगाव येथे महापालिका आयुक्त आणि अमरावती येथे अतिरिक्त आयुक्त या पदांवर काम केले आहे. त्यांची तब्बल 22 वर्षे प्रशासकीय सेवा झाली आहे. मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले पवार यांनी 1996 मध्ये परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रशासकीय सेवेची सुरवात केली आहे.

Web Title: Ahmednagar Municipal Corporation got new Commissioner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here