Home Ahmednagar Live News अहमदनगर धक्कादायक घटना: पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल घालून खून

अहमदनगर धक्कादायक घटना: पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल घालून खून

Ahmednagar Murder by putting an iron wall on his wife's head

Ahmednagar | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातून भिंगार येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल घालून खून (Murder) केल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजता भिंगारमध्ये घडली.

मंदा सुनील वैराळ (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) असे मृत खून (Murder) झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी गंगाधर नवनाथ लोढे (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

सुनील व मंदा हे दोघे पती-पत्नी गंगाधर लोढे यांच्याकडे वैद्य काॅलनी येथील इमारतीत भाडेकरू म्हणून राहत होते. सोमवारी राञी ११.१० वाजण्याच्या सुमारास सुनील वैराळ याने काहीतरी कारणाने पत्नी मंदा हिच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारुन गंभीर जखमी करून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खूनी सुनील हिरामण वैराळ याला अटक केली आहे.  त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळाताच, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. देशमुख, उपनिरीक्षक एम. के. बडकाळी यांनी डॉग स्कॉड, फिंगरप्रिन्ट स्कॉडसहीत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Ahmednagar Murder by putting an iron wall on his wife’s head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here