Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यातील या कारागृहातील १७ कैद्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यातील या कारागृहातील १७ कैद्यांना कोरोनाची लागण

Ahmednagar News 17 inmates of this jail corona

अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कारागृहातील कैद्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. नेवासा तालुक्यातून ही घटना समोर आली आहे.

नेवासा येथील कारागृहातील १७ कैदी कोरोनाबाधित आढळून आल्याचे निदान झाले आहे. त्यांना उपचारासाठी अहमदनगरला पाठविण्यात आले आहे.

याबाबत माहितीअशी की, २४ जुलै रोजी कारागृहातील काही कैद्यांना त्रास जाणवू लागल्याने सर्व ७० आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामधून १७ आरोपी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. नेवासा पोलीस ठाण्यातील १० व सोनई पोलीस ठाण्यातील ६ आणि शिंगणापूर पोलीस ठाण्यातील एका आरोपीचा समावेश आहे.

यामधील बाधित आरोपीपैकी १५ जणांना अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. एकास नेवासा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. एक आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. नेवासा कारागृहात न्यायालयीन कोठडीतील ६० तर पोलीस कोठडीतील १० आरोपी आहेत. याच कारागृहात पाच बारकी असून त्यांची क्षमता ५ आरोपींची आहे. मात्र या पाच बारकी क्षमतेपेक्षा तीन पट अधिक आरोपी ठेवले जातात.

Web Title: Ahmednagar News 17 inmates of this jail corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here