Home अहमदनगर या तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कोठडीत मृत्यू

या तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कोठडीत मृत्यू

hmednagar News Accused of murder dies in custody

राहुरी | Ahmednagar News: राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील आईला ठार मारल्याच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून जेलमध्ये असलेला आरोपी राजेंद्र गोविंद लांडे वय ४६ याचा काल मध्यरात्री मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आरोपी राजेंद्र लांडे यास मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पोटात त्रास जाणवू लागल्याने त्याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र तो उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

दोन वर्षापुर्वी तांभेरे येथील राजेद्र लांडे याने एकादशीच्या दिवशी माळकरी आईला मटण बनवण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र एकदशी असुन मी माळकरी आहे. मी बनवणार नाही, असे म्हणाल्याचा राग आल्याने राजेंद्र याने येवुन आईच्या डोक्यात जबर मारहाण केली. त्यात आईचा मृत्यू झाला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात मयताचा दुसरा मुलगा दिगंबर लांडे यांनी ३०२ प्रमाणे खुनाची फिर्याद दिली होती.

सदर आरोपी हा दोन महिन्यापासून आजारी होता. दोन आठवड्यापूर्वी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुन्हा राहुरी येथे आणण्यात आले होते. मात्र रात्री त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Ahmednagar News Accused of murder dies in custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here