Home Ahmednagar Live News Ahmednagar News: चोरट्यांनी एटीएम फोडले, पाच लाख लंपास

Ahmednagar News: चोरट्यांनी एटीएम फोडले, पाच लाख लंपास

Ahmednagar News ATM Theft Pohegaon

राहता | Ahmednagar News: पोहेगाव येथील भर रस्त्यावर इंडिया वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असलेले एटीएम मशीन शनिवारी मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या सुमारास गॅस कटरच्या सहायाने अज्ञात चोरट्यांनी तोडून नेले. यामध्ये असलेले रोख रक्कम ५ लाख ८० रुपये चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

वरील कंपनीत काम करणारा कर्मचारी स्वप्नील नंदकुमार तरटे वय २८ रा. उंदीरगाव ता. श्रीरामपूर याने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ४ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाच लाख रुपयांचा भरणा केला होता. त्यावेळी मशीनमध्ये ७९ हजार ५०० रुपये रक्कम अगोदर शिल्लक होती. एटीएम परिक्षेत्रात कुठल्याही सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला.  

Web Title: Ahmednagar News ATM Theft Pohegaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here