Home अहिल्यानगर चौकशी चौकशी काय करता, करा चौकशी टाका जेलमध्ये

चौकशी चौकशी काय करता, करा चौकशी टाका जेलमध्ये

Ahmednagar News Bavankule Put the inquiry 

अहमदनगर | Ahmednagar News: गेल्या १४ महिन्यांपासून जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाची चौकशी चौकशी करणार असल्याची भीती दाखविली जात आहे. चौकशी, चौकशी काय करता, तुमच्याकडे दोन ते तीन विभाग आहेत. करा चौकशी, टाका जेलमध्ये, आम्ही चौकशीस सामोरे जाण्यास कधीही तयार आहोत. असे खुले आव्हान भाजपचे सरचिटणीस तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला दिले.

दोन दिवसांपासून बावनकुळे हे नगर दौऱ्यावर आहे. रविवारी ते नगरला होते. यावेळी पत्रकार परिषदेत राज्यसरकारचा त्यांनी समाचार घेतला आहे.

तत्कालीन भाजप सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची चौकशी महाविकास आघाडी सरकारने लावली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या जलसंधारण कामात सहाशे कोटींचा भ्रष्टचार झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याविषयी बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले,  राज्य सरकारने जलयुक्त शिवारातून झालेल्या कामाची सीआयडी, एसीबी मार्फत चौकशी करावी, आमचे खुले आव्हान आहे. चौकशीच्या नावाने आम्ही कामे कधी बंद ठेवली नाही. पैसे दुसरीकडे वळविले नाही. मात्र या सरकाने कामे बंद करण्याचे पाप केले आहे. कोरोनाच्या नावाखाली हे सरकार पळवाटा काढत आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करीत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Web Title: Ahmednagar News Bavankule Put the inquiry 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here