Home अहमदनगर नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने मुलाचा मृत्यू

नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने मुलाचा मृत्यू

Ahmednagar News Child dies after being swept away in the river

पाथर्डी | Ahmednagar News: एका बारा वर्षीय मुलाचा नदी पार करीत असताना पाण्यात वाहून जाऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना सुसरे ता. पाथर्डी येथे बुधवारी दुपारी घडली आहे. नदीजवळ उपस्थित महिलांनी ग्रामस्थांना माहिती दिल्याने दुसऱ्या मुलास वाचविण्यात यश आले आहे.

प्रदीप सुभाष डाके वय १२ रा. सुसरे ता. पाथर्डी असे या  मयत मुलाचे नाव आहे. प्रदीप डाके हा नदी पार करीत असताना पात्रात वाहून गेल्याचे येथील कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ ही बाब ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तरुणांच्या मदतीने दोन तासांनी मृतदेह आढळून आल्याने बाहेर काढण्यात आला. या घटनने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar News Child dies after being swept away in the river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here