हे तर पळकुटे मंत्री: या मंत्र्यावर चित्रा वाघ यांची टीका
अहमदनगर | Ahmednagar News: कोकणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब त्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला हे तर पळकुटे मंत्री असल्याची टीका भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या खा. संजय राउत यांचाही त्यांनी समाचार घेतला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष वाघ या शनिवारी नगरमध्ये आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टिका केली. त्या म्हणाल्या, राज्यात पूरपरिस्थितीती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी प्रथम विरोधीपक्षाचे नेते गेले व त्यांनी लोकांना मदत केली. सरकारला मदत करण्यास भाग पाडले. अतिवृष्टीच्या ठिकाणी लोकांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य आहे.
प्रत्येकवेळी केंद्राकडे बोठे दाखविणार्या खा. संजय राऊत यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्यात्यांनी टीका केली., केंद्र सरकार मदत करणार परंतु, राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे, ती आपण निभावयला पाहिजे, फक्त सकाळी उठले की केंद्राच्या नावाने ओरडायचे नसते, असा टोला त्यांनी खा. राऊत यांना लगाविला आहे.
Web Title: Ahmednagar News Chitra Wagh criticizes this minister