अहमदनगर जिल्ह्यात ७ जून पासून काय राहणार सुरु जिल्हाधिकारी आदेशानुसार
अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात कोण कोणत्या अस्थापना सुरु राहणार आहेत. तसेच कोणते निर्बंध उठविण्यात आले आहे याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यांनी आदेश काढला आहे.
सोमवार दिनांक ७ जून २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत पुढील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.
- अत्यावश्यक वस्तूंच्या किंवा बिगर अत्यावश्यक संबंधित दुकाने/ आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील.
- मॉल, चित्रपट गृहे,नाट्य गृहे ५० टक्के क्षमतेने नियमित वेळेत सुरु राहतील.
- रेस्टॉरंट नियमित वेळेत सुरु राहतील.
- सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, याठिकाणी वावर करण्यास निर्बंध असणार नाहीत.
- खाजगी कार्यालये त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.
- सर्व शासकीय तसेच खासगी कार्यालये १०० टक्के उपस्थिती सुरु राहतील.
- सर्व क्रीडा विषयक क्रियाकल्प सुरु राहतील.
- सर्व प्रकारच्या चित्रीकरणावर कुठलेही निर्बंध नाहीत.
- बंदिस्त सभागृहामध्ये लग्न समारंभाचे आयोजनास एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० व्यक्ती यापैकी जे कमी असेल तितक्या लोकांना परवानगी राहील. खुल्या जागेतील लग्न समारंभ आयोजनास जास्तीत जास्त १० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील.
- अंत्यविधीस ५० व्यक्तीस परवानगी राहील.
- स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, निवडणुकांस निर्बंध असणार नाहीत.
- सर्व प्रकारचे बांधकाम चालू राहतील.
- कृषिविषयक सर्व क्रियाकल्प चालू राहतील.
- वस्तू व सेवांचे ई कॉमर्स व्यवहार सुरु राहतील.
- व्यायामशाळा, सलून, बेयुटी पार्लर, वेलनेस सेंटर नियमित वेळेत सुरु राहतील.
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्बंधविना सुरु राहतील.
- सर्व प्रकारची कार्गो वाहतूक चालकासह जास्तीत जास्त ३ व्यक्तीसह चालू राहील.
- सर्व प्रकारची औद्यागिक केंद्रे सुरु राहतील.
- खासगी कार, बस, दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस मुभा असेल.
या आदेशाद्वारे नमूद नसलेल्या इतर बाबींबाबत या पूर्वीचे आदेश कायम राहतील
कोविड संदर्भात आढावा घेऊन शासनाकडून वेळोवेळी प्राप्त आदेशाद्वार या आदेशात आवश्यकते नुसार बदल करण्यात येईल.
Web Title: Ahmednagar News Collector Gr About Break the Chain