जमिनीच्या वादातून दाम्पत्यास जबर मारहाण, महिलेचा विनयभंग
पारनेर | Ahmednagar News: पारनेर तालुक्यात पाडळी दर्या येथे जमिनीच्या वादातून एका दाम्पत्यास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांतील काही लोकांनी तरुणांच्या सहायाने दाम्पत्याला काठीने व चपलेने मारहाण केली. पिडीत व्यक्ती जमिनीवर पडला असता अमानुष मारहाण करत शिवीगाळ केली आहे. पतीला वाचविताना पत्नीलाही आरोपींनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या मारहाणीत दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
मारहाण झालेल्या दाम्पत्यचे नाव बाबाजी तिकोने आणि पत्नी शारदा तिकोने असे आहे. तर मारहाण करणारा दिनकर तिकोने याने मुलाच्या मदतीने अमानुष मारहाण केली. बऱ्याच दिवसांपासून या दिनकर तिकोने आणि बाबाजी तिकोने यांच्यात वाद होता. यामधून अनेकदा भांडणे झाली आहेत. पण यावेळी मात्र दाम्पत्याला अमानुष मार्हना केली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने या सर्व प्रकारचा व्हिडियो काढला आहे. याप्रकरणी पिडीत दाम्पत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रशासनाकडून अजून कोणतीही कारवाई झालेली नाही.
Web Title: Ahmednagar News couple was severely beaten over a land dispute