Home Ahmednagar Live News दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार पाठलाग करीत अटकेत

दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार पाठलाग करीत अटकेत

Ahmednagar News Criminals chased and arrested 

राहुरी | Ahmednagar News: चोरी, दरोडे अशा गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार व औरंगाबाद येथील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला समीर शब्बीर शेख रा. देवळाली प्रवरा यास राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला शनिवारी औरंगाबाद पोलिसांच्या स्वधीन केले.

शुक्रवारी मध्यरात्री उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदारा प्रभाकर शिरसाट, शिपाई गणेश फाटक,  चालक बोडखे हे गस्त घालत असताना देवळाला प्रवरा येथील डेपो चौक ते दवणगाव रस्त्यावरील शिक्षक कॉलनी येथे एक तरुण संशास्पदरित्या मिळून आल्याने पोलीस पथकाने हटकले असता सलीमे पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. राहुरी पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीस खाक्या दाखवताच औरंगाबाद येथे दरोडा टाकण्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे त्याने कबुल केले.   

Web Title: Ahmednagar News Criminals chased and arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here