अतिक्रमित टपरी हटविल्याने पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांस मारहाण
कोपरगाव | Ahmednagar News: कोपरगाव नगर पालिकेने अवैधरीत्या टाकलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याच्या कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या एका गटाने उपमुख्याधिकाऱ्यांस मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. तसेच बांधकाम विभागातील संगणक आणि टेबल वरील काचांची तोडफोड करण्यात आली.
याप्रकरणी दोन नगरसेवकांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील पूनम थियेटरसमोर बुधवारी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या दोन टपऱ्या प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या सूचनेनुसार पालिकेचे उप मुख्याधिकारी सुनील गोरडे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ व त्यांचे कर्मचारी काढण्यासाठी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान गेले असता तेथे बालाजी गोरडे व त्यांचे सहकारी आले. त्यांनी अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा केली. व गुरुवारी सकाळी नगरपालिका कार्यालायात जाऊन टपऱ्या का काढल्या असे म्हणत उपमुख्याधिकाऱ्यांस मारहाण केली. तसेच काचेची तोडफोड केली.
याप्रकरणी उपमुख्याधिकारी गोरडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे नगरसेवक योगेश तुलसीदास बागुल, नगरसेवक कैलास द्वारकानाथ जाधव यांच्यासह सनी रमेश वाघ, बालाजी पंढरीनाथ गोरडे, साई पंढरीनाथ गोरडे, निलेश पंढरीनाथ गोरडे, आशिष निलंक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Ahmednagar News Deputy Chief Officer of BMC beaten up