अहमदनगर ब्रेकिंग: जिल्हा अनलॉकची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ
अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यातील सर्वच स्तरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे जिल्हा अनलॉक होणार आहे. राज्य सरकारने पाच टप्पे नियमावलीचे निर्बंध घोषित केले आहे.
यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी उल्लेखनीय आहेत. एक म्हणजे जिल्ह्याचा पॉझटीव्हीटी दर हा पाच टक्क्यापेक्षा खाली आहे. दुसरा म्हणजे ऑक्सिजन बेडची संख्या प्रमाण २५ टक्केच्या खाली असल्याने अहमदनगर जिल्हा हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
नागरिकांनी कोरोना नियम पाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे. जर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर आठ दिवसांनी आढावा बैठक घेऊन निर्बंध पुन्हा कडक केले जातील असे त्यांनी सांगितले. सोमवारी जिल्ह्यात सर्व व्यवहार खुले होणार असल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Ahmednagar News district Unlock Hasan Mushrif