Home Ahmednagar Live News पत्नी व चिमुरडाचा हंबरडा, पित्याचा डोळ्यादेखत बुडून मृत्यू

पत्नी व चिमुरडाचा हंबरडा, पित्याचा डोळ्यादेखत बुडून मृत्यू

Ahmednagar News Father drowned before his eyes

राहुरी | Ahmednagar News: पाय घसरून एक जण तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तलवाच्या काठावरील पत्नी व पाच वर्षाच्या चिमुरड्याने हंबरडा फोडला. बघ्यांची गर्दी जमली परंतु कोणालाच पोहता येत नसल्याने सर्व जण हतबल झाले. पतीला डोळ्यासमोर पाण्यात बुडताना पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. एका तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

भानुदास जनार्दन निकाळजे वय 40 रा. प्रसाद्नगर राहुरी कारखाना असे मयताचे नाव आहे. बुधवारी दुपारी राहुरी कारखाना येथे डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या पेपर मिलसमोरील तलावात ही घटना घडली. तलावात मासे पकडण्यासाठी निकाळजे कुटुंब आले होते. त्यांनी दुपारी अडीच वाजता तलावाच्या काठावर जेवण केले. त्यावेळी कारखाना सुरक्षा रक्षकांनी येथे थांबू नका असे बजावले व तेथून निघून गेले. जेवण झाल्यावर निकाळजे मासे पकडण्यास गेले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाय घसरला. तलावातील लोखंडी अँगलला आदळून निकाळजे पाण्यात पडले. तलावात सुमारे चार पाच फुट गाळ त्यावर दहा बारा फुटापर्यंत पाणी आहे. निकाळजे यांचे डोके गाळात रुतल्याने त्यांना वर येता आले नाही. डोळ्यासमोर पती पाण्यात पडल्याने पत्नी व मुलाने हंबरडा फोडला. बघ्यांची गर्दी जमली. पोलीस व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पाहणार्यांनी तलावात शोध घेतला. सायंकाळी चार वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.  

Web Title: Ahmednagar News Father drowned before his eyes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here