Home Ahmednagar Live News बापानेच स्वतःच्या मुलास औषध असे म्हणून विष पाजले

बापानेच स्वतःच्या मुलास औषध असे म्हणून विष पाजले

Ahmednagar News father poisoned his own son as medicine

राहुरी | Ahmednagar News: जन्मदात्या बापानेच लहान्या मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाला जबरदस्तीने विष पाजून जीवे करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे पुत्राच्या नात्याला काळिमा फासणारी हि घटना ९ जुलै रोजी घडली. रविवारी दिनांक २५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश बाळासाहेब म्हसे वय ३५ याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तो त्याच्या घरात अंथरूणावर झोपलेला होता. त्यावेळी त्याचे वडील आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे व भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे हे दोघे आले त्यांनी विचारले तुझे दुखणे बरे आहे का, तू जेवण केलं का असे म्हणून तुझ्यासाठी औषध आणले आहे.  

हे घे मग तुला बरे वाटेल असे सांगितले. फवारणीसाठी आणलेल्या कीटकनाशकाची बाटली गणेश याने वडिलांच्या हातात पहिली. त्याने ते पिण्यास नकार दिला. त्यामुळे गणेश याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर याने पाठीमागून दाबून धरले. वडील बाळासाहेब म्हसे याने त्याच्या हातातील कीटकनाशक गणेशच्या तोंडात ओतले. गणेश त्यांस विरोध करत होता. परंतु आरोपीने संगनमत करून बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गणेश म्हसे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Web Title: Ahmednagar News father poisoned his own son as medicine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here