Home Ahmednagar Live News या धक्कादायक कारणामुळे मुलीच्या आई, वडिलांसह पती, सासू- सासर्‍याविरोधात गुन्हा दाखल

या धक्कादायक कारणामुळे मुलीच्या आई, वडिलांसह पती, सासू- सासर्‍याविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar News Filed a case under Atrocities Poxo Child Marriage Prevention Act

अहमदनगर | Ahmednagar News: अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याने आई वडील, पती, सासू सासरा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कायाद्यान्वे गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी फिर्याद दाखल केली आहे.  नगर तालुक्यात ही घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह मे 2020 मध्ये तालुक्यातील एका मुलासोबत लावून देण्यात आला. मुलगी अल्पवयीन असतानाही आई-वडिलांनी विवाह लावून दिला. तर मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या पतीने तिच्याशी संबंध ठेवले.

यातून ती मुलगी गर्भवती राहिली. मुलीला रूग्णालयात दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. मुलीची प्रसृती झाली आहे. यावेळी पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला आहे. या जबाबावरून उपनिरीक्षक कणसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. नगर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Filed a case under Atrocities Poxo Child Marriage Prevention Act at MIDC Police Station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here