Home Ahmednagar Live News शेतात छेड काढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

शेतात छेड काढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Ahmednagar News Harassment of a minor girl

श्रीरामपूर | Ahmednagar News Crime: श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे एका अल्पवयीन मुलीची शेतात छेड काढून दोघांनी तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा रवी निंबाळकर व अण्णा निंबाळकर यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, संबंधित आरोपींनी शेतात अल्पवयीन मुलीचा हात धरून शाररिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीस यावेळी शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे वरील चार जणांविरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे. 

Web Title: Ahmednagar News Harassment of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here