श्रीमंतांना आपल्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेऊन खंडणी मागणाऱ्या महिलेच्या साथीदारास अटक
अहमदनगर | Ahmednagar News: श्रीमंतांना आपल्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेऊन खंडणी मागणाऱ्या जखणगाव महिलेच्या आणखी एका साथीदारास पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिथापीने अटक केली आहे. तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेचा साथीदार आरोपी महेश बागले याला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणीनगर तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे अगोदरच दाखल आहेत. यामधील आरोपी महेश बागले हा मिळून आला असून आणखी एक जण फरार आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे.
एका अधिकाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत शरीरसंबध ठेवून त्याचे विडीयो चित्रीकरण करून तीन कोटी खंडणी मागणाऱ्या जखणगाव येथील महिला व तिचा साथीदार अमोल मोरे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी बागले व खरमाळे हे दोघे फरार होते.
नगर तालुक्यातील शहा डोंगर परिसरात एका लग्नासाठी बागले येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने महेश बागले याला पाठलाग करत ताब्यात घेतले आहे. या घटनेचा आणखी उलगडा होण्याची शक्यता आहे.
Web Title: Ahmednagar News Jakhangaon ladies Honey trap Case