Home अहमदनगर वीज कोसळल्याने एक जण जागीच ठार

वीज कोसळल्याने एक जण जागीच ठार

Ahmednagar News lightning strike killed one person on the spot

कोपरगाव | Ahmednagar News: कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मणवाडी येथे विहिरीचे काम करीत असलेला तरुण जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे.

संतोष जाधव रा. दहीगाव बोलका  असे या ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सागर जाधव हा जखमी झाला आहे.

संवत्सर शिवारात अजय भाकरे या शेतकऱ्याचे विहिरीचे काम सुरु आहे. त्यात विहिरचे काम करीत असलेला तरुण संतोष जाधव व सागर जाधव हे काम करीत असताना विजांचा कडकडाट सुरु झाला. संतोष व सागर दोघेही विहिरीतून बाहेर आले. नारळाच्या झाडाखाली थांबलेले असताना त्यावेळी वीज पडली यामध्ये संतोष जाधव ठार झाला तर सागर हा जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar News lightning strike killed one person on the spot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here