चार चाकी विकण्याचा बहाणा करत तरुणाला ५० हजारांना गंडा
राहुरी | Ahmednagar News: चार चाकी वाहन विकण्याचा बहाणा करून एका भामट्याने राहुरी येथील संतोष मोरे या तरुणाला ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे, ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली. याप्रकरणी २९ जुलै रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोककुमार या व्यक्तीने फेसबुकवर वेगनर कंपनीची चार चाकी गाडी विकण्यासाठी फोटो टाकले. दरम्यान राहुरी येथील संतोष सखाराम मोरे या तरुणाने फेसबुकवर गाडीचे फोटो पाहून अशोककुमार यास संपर्क केला. गाडीचा व्यवहार करून गाडी घेण्याचे ठरले. त्यानंतर संतोष मोरे या तरुणाने दि. ५ ते ७ फेब्रुवारी कालावधीत गुगल पे व पेटीएम द्वारे ४८ हजार रुपये पाठविले. मात्र पैसे दिल्यानंतर वाहन मिळत नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष मोरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली त्यावरून पोलिसांनी अशोककुमार नामक याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Ahmednagar News married woman was burnt alive to bring two lakh rupees