Home अहिल्यानगर पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत लुटमार

पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत लुटमार

Ahmednagar News petrol pump, robbers looted at gunpoint

अहमदनगर | Ahmednagar News: नगर तालुक्यातील सोलापूर रोडवर दहिगाव साकत शिवारात केतन पेट्रोल पंपावर ६ ते ७ दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केल्याची घटना आज पहाटे घडली. या हल्ल्यात पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे.

पेट्रोल पंपावरील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड लंपास करत चोरून नेली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

डॉग स्कॉड पथक, फिंगरप्रिंट घटनास्थळी दाखल झाले आहे. दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही गायब केले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्करणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.

Web Title: Ahmednagar News petrol pump, robbers looted at gunpoint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here